Tuesday, September 9, 2008

गणपती बाप्पा मोरया !

नेहमीप्रमाणे वाजतगाजत गणपती आले.
गेल्या काही वर्षांत, विशेषतः जेव्हापासून माझ्या जाणीवा आणि संवेदना अधिक तीव्र झाल्या तेव्हापासून मी दरवर्षी गणपती आलेला पाहतो. दहा दिवस थांबतो आणि विसर्जन...पुन्हा पुढल्यावर्षी आहेच...
माझ्या आयुष्यात गणपती येण्याने आणि त्याच्या दहा दिवस थांबण्याने काय फरक पडतो, याचा मी यंदा विचार केला...विचारांची ही प्रक्रिया अजूनही सुरू आहे. आतापर्यंत काहीच विशेष फरक पडल्याचे जाणवले नाही. कदाचित संस्कृतीरक्षक मला असं सांगून समजाविण्याचा प्रयत्न करतील, की लोकमान्य टिळकांनी समाजप्रबोधनासाठी आणि सामाजिक ऐक्यासाठी या उत्सवाची सुरुवात केली वगैरे...ओके. मानलं. पण आता काय?
आता याचा वापर केवळ राजकीय शक्तीप्रदर्शनासाठीच होतो, आणि काही जणांसाठी गणपती हे अर्थाजनाचं साधन आहे. या पलीकडे गणपतीचं महत्त्व काय?
लालबागचा राजा...माझ्यामते केवळ मीडियानं मोठा केलेला गणपती.
बारकाईन विचार केल्यावर आणि पाहिल्यावर अनेक गोष्टी मला अस्वस्थ करून गेल्या. ज्या दिवशी गणपती आले त्यावेळी मिरवणुकीला ढोल-ताशाच्या तालावर अनेक मुलं नाचत होती. स्पष्ट सांगायचे तर बहुजन समाजातील. आणि त्यांच्या मागे सवर्ण घरातील मुंल हातात गणपती घेऊन...हीच ती बहुजन समाजातील मुलं दहा दिवस रात्रभर जागून गणपती साजरा करतात. त्यांचा त्या गणपतीशी तेवढाच काय तो संबंध. आणि सवर्ण घरातील मुलं सकाळ-संध्याकाळ आरती आणि मग अभ्यास. आज असलेलं हे चित्र 25 वर्षांनी काही वेगळं नसेल. याचं कारण म्हणजे आज गणपतीच्या पुढ्यात नाचणारी ही मुलं 25 वर्षांनी त्यांच्या मागे म्हणजे गणपती घेऊन किंवा आरती करून अभ्यास करालया बसलेल्या मुलांच्या गाड्यांवर ड्रायव्हर म्हणून काम करणार. गणपतीत पुन्हा दहा दिवस नाचगाणी करणार, रात्री जागविणार. आणि त्यांचे मालक आपल्या मुलाकडून आरती करून घेऊन त्याला अभ्यासाला बसविणार...
जागतिकीकरणाच्या आणि अणुकराराचा झेंडा मिरवणा-या देशात विषमतेचे यापेक्षा जळजळीत उदाहरण आणखी काय हवे...सुजाण माणसं म्हणतील की हे खरयं किंवा खोटंय किंवा अतिरेकी आहे. ..पण हे वास्तव आहे...आपल्यासारख्या लबाड झालेल्या लोकांनी (सभ्यपणाच्या बुरख्याआड संवेदना लपविलेल्या लोकांनी) हे वास्तव नाकारायचं असं ठरवलं आहे !!!

4 comments:

Anonymous said...

तज्ञांनी आणि विचारवंतांनी धार्मिक,सामाजीक आणि आर्थिक विषमतेवर वेळीवेळी भाष्य केले आहे.मात्र जी गोष्ट सामाजीक एकोप्यासाठी धार्मिक नव्हे निर्माण करण्यात आली आहे, त्याचेच विच्छेदन करून जो विचार या लेखात मांडण्यात आला आहे तो खरच अस्वस्थ करणारा आहे. खरच अशा सकस लेखनाची गरज आहे. या लेखातील एका निरीक्षणाची विशेष नोंद करावीशी वाटते आणि ती म्हणजे लाल बागचा राजा. the total projection of media attributes.

Anonymous said...

So what are you suggesting? Are you upset that 'savarna' people study instead of celebrating Ganapati? But your logic suggests that you do not like sarvajaneek Ganapati.So if we do not have sarvajaneek Ganapati, then won't the 'savarna' students get more time to study? Or you just want to bash brahmins in a hidden manner?

Anonymous said...

Public or Private Ganpati Celebration might not be affecting your life but this is not the case with all. As you mentioned Ganpati is source of income. I don't see any problem in that. If media, Ganeshutsav mandal, Murtikar, Flower stall vendors, Sweet marts if all are earning for entire year in those 10 days, I am happy. It helps them to move there life line.
It's not question of Sawarn or Dalit. Visit once in Girgaum ( I visited it 2006 ) you'll find people leave there caste and religion out of this celebration.

Anonymous said...

You are not making an attemt to produce any solution to the situation you have perceived.

So in such a situation, does it going to be useful.. ?

Expressions attched to problems are nothing new to this world,it is the act like most of the people.... what would new ..if you suggest rationally..will be the solutions..!..
your post shows vague assumptions..
Refinement needed.