Wednesday, September 24, 2008

...शेवटी जात नाही ती जात !

अखेर खैरलांजी हत्याकांड प्रकरणाचा निकाल आला, 6 दोषींना फाशी आणि 2 दोषींना जन्मठेप.
न्याय मिळाला !
खरचं मिळाला न्याय ?
निर्णयानंतर भैय्यालालचं सर्वस्व त्याला परत मिळेल ?
21 व्या शतकात झालेल्या या हत्याकांडाला केवळ एका मानवी समुहानं चार मानवांचा बळी घेतला एवढी पार्श्वभूमी नव्हती तर, पुरोगामित्त्वाचा झेंडा फडकविणा-या देशात आजही दलितांचा बळी जातो ही बाब या निमित्ताने अधोरेखित झाली.
चतुर्वणाची आणि मनुवादाची परंपरा असलेल्या या देशात शतकानुशतके असेच झाले, असे होत आहे, आणि असेच होत राहणार !

कृपया याला माझा निराशावाद समजू नका.

हे वास्तव आहे. जातपात पुसली जात नसून, जातव्यवस्थेची मूळ मानवी मनांत अधिक तीव्रपणे रोवली जात आहे. भैय्यालाल हा याच एका व्यवस्थेचा बळी आहे. या घटनेनं केवळ त्याच घर उध्वस्त झालं नाही, तर त्याच्या घराला घरपण देणारी माणसंही त्यानं गमावली.

शेवटी...जात नाही ती जात ! हे वास्तव आहे.

2 comments:

Vinod Patil said...

अप्रतिम विचार. मात्र आजही या देशात दलितांचा बळी जातो असं म्हणण्यापेक्षा माणसं माणसाला मारतात, कापतात हे म्हणणं जास्त योग्य होईल. मला भोतमांगेबद्दल तेवढीच सहानुभुती आहे. जेवढी तुम्हाला. माझ्या गावाजवळच्या गावातल्या दोन कुटुंबातील वादात चार जणांना अक्षरशहा कापून फेकण्यात आले होते. दोन्ही कुटुंबं पाटील समाजाचेच होते. यावरून मला जातियवाद नाही हे सिद्ध करायचं नाही. कारण मी देखील एके काळी या जातियवादाचा बळी ठरून आयुष्यातली अमुल्य गोष्ट गमावून बसलो आहे. परिस्थिती अशी राहणार असं जर तुम्ही म्हणत असाल तर ते पुर्णत: योग्य नाही. कारण मला आठवत माझ्या आजोबांच्या पिढीपर्यंत आमच्या गावात दलितांना कथित उच्च वर्णियांच्या घरात मुक्त वावर नव्हता. मी ते स्वत; अनुभवले आहे. मात्र आज माझे सर्व दलित मित्र माझ्या घरी येतात, जेवतात. आणि असे माझ्याचं बाबतीत नाही तर संपुर्ण गावाचेच वातावरण बदललेले आहे.पैशांसाठी नवराही बायकोचे तुकडे करतो, तिला जाळतो, आई पोटातच आपल्या मुलीला खुशीने मुक्ती देत असते. त्यामुळं अशा घटना घडत राहतीलच. शेवटी ही वृत्ती आहे. मात्र तुमच्या आणि माझ्या सारख्या लोकांमुळं ती काही दिवसांत कमी कमी होत जाईल आणि येत्या काही वर्षात जात हा प्रतिष्ठेचा विषय राहणार नाही याचा मला पुर्ण विश्वास आहे.

Anonymous said...

I totally agree with Vinod here. What you'll say to killings in US? A person killed whole family in Seattle theater because they were laughing loudly during Comedy movie.