Friday, June 26, 2009

एका शापित गंधर्वाचा अंत...

मायकल जॅक्सन मेला !...एका शापित गंधर्वाचा हा अंत अत्यंत चटका लावून गेला...मायकल मेला..असं म्हणताना मनाला यातना होताहेत...पण 'तो मेला' हे क्रियापद केवळ त्याच्यावरील प्रेमापोटीच.
शाळेत असल्यापासूनच विशेषतः जेव्हापासून पाश्चात्य संगीत कळायला लागलं, त्याबद्दल माहिती झाली तेव्हा एलिटन जॉन असेल, जॉर्ज मायकल असेल किंवा अन्य कोणी...पण कायम पारायण ज्याच्या गाण्यांचे केले तो एकमेव मायकल जॅक्सन होता..
मायकलच्या प्रत्येक गाण्यात किंवा अल्बममध्ये केवळ व्यावसायिक एप्रोज नव्हता तर त्याला एक थीम होती...ही थीम केवळ मार्केटिंगसाठी नव्हती तर त्या थीमला एक सामाजिक आशय होता...
कलाकाराने त्याची प्रतीभा जर सामाजिक भान राखून समाजकारणासाठी वापरली तर त्याचा परिणाम किती आणि कसा साधला जातो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे मायकल जॅक्सन. उदाहरणादाखल सांगायचे झाल्यास व्हिएतनाम युद्धाच्यावेळी अमेरिकेने विशेषतः 'काळ्या' लोकांच्या हिंसेविरोधात मायकल जॅक्सनने अशाच पद्धतीने आपल्या गीताच्या माध्यमातून आवाज उठवला होता...त्या गीताच्या काही ओळी खालीलप्रमाणे...
"Heal The World"
There's A Place InYour HeartAnd I Know That It Is Love
And This Place CouldBe MuchBrighter Than Tomorrow
And If You Really TryYou'll Find There's No Need To Cry
In This Place You'll FeelThere's No Hurt Or Sorrow
There Are WaysTo Get There
If You Care EnoughFor The Living
Make A Little Space
Make A Better Place
...Heal The World
Make It A Better PlaceFor You And For Me
And The Entire Human Race
There Are People Dying
If You Care Enough
For The Living
Make A Better PlaceFor You And For U and For me.
एखाद्या व्यक्तीची विशेषतः कलाकाराची संवेदना जोपर्यंत जागृत असते तोपर्यंतच त्याची निर्मितीक्षमता शाबूत असते...मायकलमध्ये ही संवेदना तो मरेपर्यंत कायम होती...त्याच्यातली संवेदना जशी त्याच्या निर्मितीक्षमतेचा स्त्रोत होती, तशीच त्याच्या आजूबाजूला वावरणा-या व्यक्तींच्याही निर्मितीक्षमतेचा स्त्रोत होती, याचे उदाहरण मायकलची सख्खी बहिण जेनेथ जॅक्सन...
मायकलच्या कलेबद्दल तर काय बोलावं, शब्दच म्यान होतात. गोड-कडू अशा अनेक आठवणींच्या हिंदोळ्यावर असलेले मायकलचे आयुष्य कधी सावरलेच नाही...जगाला आपल्या तालावर थिकरवणा-या मायकेलने आयुष्यात असे अनेक दाहक अनुभव घेतले....
पण तरीही काहींना प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची कला चांगली जमते. 'बाय हूक ऑर बाय क्रूक' हे त्यांच्यासाठी वेगळ्या अर्थाने लागू होतं. मायकेल जॅक्सनही त्यापैकीच एक. काही वेळा तर तो प्रसिद्धीच्या मागे लागण्यापेक्षा (अप)प्रसिद्धीच त्याच्या मागे लागली. ७० च्या दशकात अमेरिकेला स्वत:च्या संगीतावर झुलायला लावलेला जॅक्सन जगभर प्रसिद्ध झाला, ते त्याच्या डान्समधल्या कॉम्प्लिकेटेड स्टेप्सनी.
रॉक, पॉप हे वेस्टर्न कल्चर. भारतातल्या हाय क्लासला या कल्चरची ओळख असली, तरी मुंबईतल्या चाळीपर्यंतही हे कल्चर पोहोचवलं ते मायकेल जॅक्सन आणि मडोनाने. अमेरिकेत पॉप म्युझिकच्या प्रेझेण्टेशनमधे एकीकडे कमालीचा बदल करतानाच डान्समधल्या त्याच्या फिजिकली कॉम्प्लिकेटेड स्टेप्सनी सर्वांनाच वेड लावलं. डान्स करताना हा माणूस हाडं बाजूला काढून ठेवतो का, याला गुरुत्वाकर्षणाचे नियमही लागू होत नाही का, असे प्रश्न गमतीने विचारले जात होते. याच दरम्यान मायकेलने नाकाचा शेप बदलण्यासाठी त्यावर १७ शस्त्रक्रिया केल्याची चर्चाही होती. पॉप म्युझिकवर डान्स करताना मायकेलने केलेल्या स्टेप्स महत्त्वाच्या मानल्या जाऊ लागल्या. वेस्टर्न डान्स हे जॅक्सनच्या स्टेप्सशिवाय पूर्णच होऊ शकत नाही, अशी भावना गेल्या दशकापर्यंत होती. जॅक्सनच्या या स्टेप्सपैकी सर्वात हिट ठरल्या, त्या रोबोट आणि मूनवॉक. हात हवेत स्थिर ठेवत हवेत चालण्याची कसरत नंतर बॉलिवूडच्या नायकांनीही अनेकदा करून दाखवली. एक वेळ अशी आली, की संगीतापेक्षा मायकेलचा डान्सच अधिक महत्त्वाचा ठरला...
असो, काही असलं तरी मायकल जॅक्सन आज गेला....असं म्हणतात की गंधर्वांना सर्व कला अवगत असतात, हा गंधर्व शापित होता. पण शापित असला तरी तो गंधर्व होता...आणि म्हणूनच तो गेला...आणि तोही अगदी मनाला चटका लावूनच !
मायकल जॅक्सन हे एक वादळ होतं...आणि आता हे वादळ ओसरलयं इतकचं.

13 comments:

संदीप दि.साखरे said...

चांगल लिहलयेस.. मायकल जॅक्सन हा एका संस्कृतीची ओळख होता.. विशेषत पॉप संगीताची ओळखच आमच्या पिढीला मायकलमुळे झाली.. आजही जगातील आणि विशेषत आपल्याकडेही पॉप संगीतातलं फारसं काही माहित नसलेल्यांनाही मायकल नक्कीच माहित होता. तो वादात राहिला किंवा जगला, तरी तो कलावंत असल्याने ते स्वाभाविक आहे. नक्कीच त्याच्या मृत्यूने जग एका चांगल्या कलावंताला मुकले आहे.

muktangan said...

gelelya manasala asa "mela" nahi mhanu. nidan "varala" tari mhanava.

Bhagyashree said...

far chhan lihlay..
saglya bhavna tantotant pochlya!
he will always be remembered!

Anonymous said...

chatakaa laavanaari ghatana ani lekhan. khoop chhan!
-Dinesh

Dilip Waghmare said...

maycle jackson chi khaee olakh adhorekheet jhalee aahe.kaal divasbhar mee adhe made marathee chanel baghat hoto.pan tyane konatee ganee gayalee,teecha atha kay,tee konaasathee hotee,ya baddal kaheet navhate.eka kalyaa mulache kautuk krayache pan tyachya kalechyaa aashyabaddal kaheech bolayche naahee,sadareekarnaache godave gayache.heech jagrahatee rahilee aahe.maycle hi tyalaa apvaad jhalla nahee.abhijanannee tyaalaa melyanantarhee marle.

Anonymous said...

verrrryyyy nice...i fully understand your predicament, since my younger brother too was a hige fan of MJ. Even though he was weird, rather more than that one cannot erase his genius in music or his passion.

that is the only reason why he could write such songs...may be somewhere there was a message in "I'm bad, I'm bad..." kay mahiti?? aso...you've written from your heart..what u've felt & a reader can feel that..neeta

yogesh bidwai said...

"Jai Ho,MJ!"

"Life is short..! Artists and their art live forever. Jai Ho, MJ ! We love you for your music, regardless of all the controversies!"
Michael Jackson was symbol of limitless energy, perfection and vision.

"MJ, for most of our generation, was an icon who made uncompromising
music. He pushed the milestone of pop music to unbelievable levels through the 80s and 90s.

'MJ' loved India and the Indian people. He was bursting with energy. Every dance move he did came from his soul and did a five second stunning example. It was like a lightning strike.

He was concerned about evelopmental
issues such as global warming and about wars and its damages to the human community.

"MJ had been a youth icon for over three decades. He deserves a special place in history. His demise has robbed us of a great musician and a noble human being."

The 50-year-old singing sensation died Thursday following a cardiac arrest at his home in Los Angeles, leaving millions of his fans around the world stunned.

"Heal The World"
...Heal The World
Make It A Better Place For You And For Me
And The Entire Human Race
There Are People Dying
If You Care Enough
For The Living
Make A Better Place For You And For U and For me.

मिलिंद भागवत said...

छान जमलय.. एक वेगळा एँगल लिहील्याबद्दल धन्य़वाद.. लिहीत रहा.. ऑल ग बेस्ट.. बिनधास्त लिही..

Megh raaj said...

मला पाश्चात्य आणि शास्त्रीय संगितातलं काही कळत नाही.
मायकल जैक्सन माझ्यापर्यंत पोहोचला तो बातमीचा विषय म्हणूनच.....
त्याच्या गाण्याची जातकुळी, अर्थ, अन्वयार्थ याच्याशी कधी संबंधच आला नाही.
तू इथे जी मायकेलची ओळख करुन दिलीस, ती आज पहिल्यांदाच झाली.
सुरेख आहे आणि चटका लावणारं
ही reax mobile वरुन लिहिलीय.सकाळचे 7 वाजलेत आणि रविवार
ही वेळ मनसोक्त ताहिरा सय्यद ऐकण्याची
मायकेल कधी आपल्या डोक्याच्या गावाला आलाच नाही.

Durgesh Sonar said...

वा गडनीस वा...मायकेल जॅक्सन आता कायमच दंतकथा बनून राहील हे निःसंशय... तुझ्या लेखनातून वेगळा मायकेल दिसला... मस्त रे...

उड चल कहीं said...

UNBELIVEABLE thoughts.....really!! i have no idea that u r such good writer..i was completly Unaware about this aspect of ur personality....pls keep this momentum as it is...nd finally thanx for such wonderful info on all time best MJ....
dinesh mourya

Unknown said...

Good writing skills. But Manoj, you must take these writing skills to write more about people around you in your city and state. You will able to connect with them much better and your writings will also be more palatable to the readers.

Kailash Rajwadkar

दिनेश पोतदार said...

व्वा! छानचं लिहिलंय..'सॉंग डान्स' या कलाप्रकाराबद्दल असलेल्या माहितीत निश्चित भर पडली..मी काही मायकेलचा फॅन नाही..पण त्याचं गाणं पुन्हा ऐकणं पहावसं वाटेल. अमेरिकन भांडवलशाही व्यवस्थेत मायकेलसारख्या कलावंतांचं सामाजिक भान निश्चित उठून दिसतं. मात्र,याच मायकेलवर पिडोफिलियासारखे गंभीर आरोप होतात, त्यावेळी मनुष्य कितीही थोर असला तरी त्याला एकदम ब्लॅक किंवा एकदम व्हाईट ठरवता येतं नाही, असं जरुर वाटतं...मग मायकेलसारखा माणूस असं का वागतो?...पराकोटीची संवेदनशीलता आणि अमर्याद दैवी गुणवत्ता यांना स्वनियंत्रणाच्या जाणीवा फारश्या नसल्या तरी काहीश्या बोथट असतात..आणि त्यावेळी मायकेल आणि त्याच्यासारख्या इतर जीनियसच्या चूका क्षम्य ठरावश्या वाटतात..हाड बाजुला ठेवून मायकेल नाचतो का? असेल कदाचित..नाचतांना ट्रांसमध्ये जाणारा निजिन्स्कीही बाराफूटापर्यत उड्या मारायचा असं म्हणतात..गुपित तेचं जाणोत.. चांगल्या माहितीबद्दल धन्यवाद..मला वाटत होत की तुमच्याकडे 'हॉटेल कॅलिफोर्निया'हा एकचं वेस्टर्न पीस आहे !!!
--दिनेश पोतदार