Sunday, April 20, 2008

मन मनास उमगत नाही...

मन मनास उमगत नाही...
विश्वात असलेल्या लाखो अवकाशगंगा...अवकाशगंगेत असलेली एखादी अवनी...त्या अवनीवर असलेला एक भारत...भारतात असलेली मुंबई आणि त्या मुंबईत असलेला एक मी...
कशाच्या तरी सतत शोधात...
शोध कसला...व्यक्तीत्त्वाचा..व्यक्तीमत्त्वाच्या...अवकाशगंगेत असलेल्या या अवनीवरील माझ्या अस्तित्त्वाच्या प्रयोजनाचा....
सध्या अनेक उत्तरीत प्रश्नही अनुत्तरीत वाटताहेत...
मनाची ही स्थिती अनाकलनीय...पण ही अनाकलनीय अवस्थाही झालीये परिचित...
पाहूया आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर काय काय अनुभूती येते ती...

तुम्ही आणि मी मिळून चर्चा करूया...शेअर करूया आपले अनुभव या ब्लॉगच्या माध्यमातून...

3 comments:

Anonymous said...

let us really discuss

Anonymous said...

Janmala aalelya pratyek soodnya vyaktila kadhi na kadhi ek prashna padto to mhanje aapan kon aahot ani aaple Vyaktitva.. aaple mahatva.. Pruthviwar aslele aaple astitva aani tyache nemke prayojan kay?
Tuzya pramanech mazya sarkya anekanna chhalnara ha mahatwacha anuttarit prashna!
Shodh suruch ahe ani akhand chalu rahnar aahe..
Aayushyachya vegveglya tappyanwar yenare anubhav aapla jagna arthpurna banavtat tar kadhi nirarthak hi..
Manashich maitri karun aapan aapla jagna adhik samrudhh banavayla kay harkat aahe? Shubhechha !!

Anonymous said...

सुरुवात तर चांगली झालीय,मित्रा...खरंतर,आज पहिल्यांदाच वाचतेय तुझा ब्लॉंग.मनातले सगळे "ब्लॉकस्" या ब्लॉगद्वारे निघून जावोत आणि हा वेगळा प्रवास उत्तरोत्तर अधिक सुरळीत होवो,ही सदिच्छा..
शिल्पा देशपांडे