Monday, December 29, 2008

लढाई अस्तित्त्वाची...विजय मृत्यूचा !

होय, मुंबईकरांनो तुमची चूक आहे...कुणलाही दोष देऊ नका !
दहशतवादी हल्ल्यात, बॉम्बस्फोटात तुम्ही मेलात...तुम्ही मरायलाच हवे होतात.
तुम्हाला काय वाटतं, लोकशाहीत आणि सात स्वातंत्र्यांच्या नावाखाली तुम्हाला जगण्याचा अधिकार आहे...
अरे तुम्ही तुमच्या अधिकारात साधा शर्ट विकत घेऊ शकत नाहीत....
जगण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला ?
दहशतवादी हल्ल्यात तुम्ही मेलात...खूप सुखाचं मरण आलं...अगदी नकळत...अगदी अलगद !
व्यवस्थेच्या विरूद्ध लढाई करणा-यांना अशा मरणाचं काय ?
नशीब समजा, तुमचा भूकबळी गेला नाही, जातीयवादी दंग्यात तुम्ही मेला नाहीत...तुमचा बळी घेतयालं व्यवस्थेनं !
अपेक्षा करण्याचा तुम्हाला, मला...अन् कुणालाही अधिकार नाही...
कारण आपणचं जवाबदार आहोत, या सर्वाला...
नागरिकांची जी लायकी असते त्या प्रमाणेच त्यांना सत्ता आणि शासन मिळते...
त्यामुळे तुम्ही मरा...असेच मरा...
परिवर्तनाची नांदी तुम्हाला ऐकू येत नाही...त्या नांदीत सहभागी होण्याची तुमची इच्छा नाही...
मग मरा !
असंच होत आलयं...असचं होत राहिलं....
पण आता...
अस्तित्त्वाच्या लढाईत मृत्यूचा विजय झाला इतकचं !

3 comments:

Vinod Patil said...

वास्तव मांडतांना फारच परखड शब्द वापरले आहेत. मात्र आजचं वास्तव हेच आहे तेही तेवढच खरं. सामान्य माणूसच त्याच्या आजच्या शोकांतीकेला जबाबदार आहे हे देखील या छोटेखाणी मात्र अर्थपुर्ण ब्लॉगमधून जाणवतं.

Anonymous said...

It is partly true that people are responsible for it. But dont sound so negative about life.

Anonymous said...

कुणा तरी k ची प्रतिक्रिया खूप बॅलन्स आहे.

हे लिखाण एक खूप चांगली कविता होईल, पण एवढी नकारात्मक नको....